Saturday, 3 February 2018

राजनीती मुळात वाईट नाही...ती ज्या व्यक्तीच्या हाती जाते त्या प्रमाणे तिची जडण घडण होत जाते....स्वाती वाघ.


एक प्रवास
स्वतः पासून ऊर्जेच्या दिशेने...राजनीतीच्या दिशेने पहिल्यांदा ठेवलेलं एक डोळस पाऊल...ज्यामध्ये मला माझी व्यक्तिगत पैलूंची सामाजिक जडण घडण होताना दिसली ..भीती निघून गेल्यावर... आत्मविश्वास वाढतो...व आत्मविश्वासाला मिळालेली योग्य दिशा म्हणजे ऊर्जा...याचा अनुभव आला तो " थिएटर ऑफ रेलवन्स" च्या राजनीती चिंतन रैली मध्ये.... विषय सुंदर त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव करून देणारा एक नागरिक म्हणून आरसा दाखवणारा...

व्यक्तिगत पक्षा पलीकडे... व्यक्तिगत भक्ती पलीकडे... राजनीती आहे... "राजनीती शुद्ध , सात्विक, पवित्र, बौद्धिक, सामाजिक ,आर्थिक, सांस्कृतिक ,आर्थिक पराकाष्ठाओ की स्वामिनी!!! " मंजुल भारद्वाज लिखित व्याख्येचे वाचन केल्यावर डोक्यात राजनीती साठी असलेलं दूषित चित्र हळू हळू नाहीस होऊ लागते...जाणीव होउ लागली , व्यक्तिगत स्वार्थासाठी निरनिराळे पक्ष निर्माण होतात...मग त्याप्रमाणे या जनसमुदायची सुद्धा विभागणी होते... व्यक्तिगत ताकद वापरून... एकमेकांवर शिंतोडे उडवत...मग स्पर्धा जिकण्याची... निवडणुकांची...हे पक्ष तयार होतात...प्रत्येक पक्ष स्वतः चे फोल्लोवर्स करण्याचा आटोकाट प्रयत्न...मग दिवसा सुद्धा चांदण दाखवणं...आणि यात वैचारिक कमी तर आंधळी भक्ती निर्माण होते...
या मध्ये व्यक्ती नागरिक कमी..भक्त जास्त दिसतो...दुसरा या दोघांतील काही नाही झालं तर सभ्यतेची चादर पांघरून वावरत असतो..व या मध्ये गर्दी निर्माण होते ज्याला दिशा नसते आंधळी भक्ती करणारी गर्दी...
मग जाणवलं... राजनीती मुळात वाईट नाही...ती ज्या व्यक्तीच्या हाती जाते त्या प्रमाणे तिची जडण घडण होत जाते...त्या व्यक्तींना आपण राजनेता म्हणून संबोधतो...
व याची जडण घडण कोणाच्या हाती सुपूर्त करायची याचा निर्णय हा "नागरिक" म्हणून आपला असतो...जसे मुलं व्यसनी निघालं म्हणून आईच्या गर्भाला दोष देत नाही...तर त्यासाठी त्याच्या आजूबाजूचं वातावरण व त्याची होणारी जडण घडण कारणीभूत असते...अगदी असंच राजनैतिक डावपेचाचा सापळा रचून राजनीती ला दूषित करण्याचं षडयंत्र हे वर्षानुवर्षं सुरू आहे...तर अश्यावेळी एक नागरिक म्हणून स्वतः ची भूमिका डोळसपणे , निःपक्षपाती पणे ज्यावेळी या देशाचा प्रत्येक व्यक्ती बजावेल...निभावले.. त्या वेळी क्षणोक्षणी राजनीतीचा नव्याने संविधानिक जन्म होईल...ही वैचारिक स्पष्टता " थिएटर ऑफ रेलवन्स च्या राजनैतिक चिंतन रैली" मध्ये मला आली.

दिनांक 
21 जानेवारी 2018
स्वाती वाघ.

No comments:

Post a Comment