Wednesday, 7 February 2018

"Gravity " म्हणजे गुरुत्वाकर्षण..

"Gravity " म्हणजे गुरुत्वाकर्षण..


कार्यशाळेत असताना अजून एक शब्द लहानपणी शाळेत शिकवल्या गेलेल्या विज्ञाना च्या पुस्तकातील न्यूटनची आठवण करून देऊन गेला...शब्द होता स्वतः मधील Gravity... हो गुरुत्वाकर्षण...
‎न्यूटन नियमाप्रमाणे वस्तुमान असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंच्या एकमेकांकडे आकर्षिल्या जाण्याच्या प्रवृत्तीला गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. थोडक्यात कोणतीही वस्तू वरून फेकली असता ती सरळ जमिनीच्या - पृथ्वीच्या दिशेने खाली येते, म्हणजेच एक अज्ञात शक्ती , वायब्रेशन तिला पृथ्वीकडे आकर्षित करते.
"विश्‍वातल्या सर्व वस्तू एकमेकांना आकर्षित करतात" या वैज्ञानिक मूलभूत नियमावरून निसर्गाची रचना लक्षात येऊ लागली...सूर्य , ग्रह, तारे , समुद्र , सूर्यमाला, धूमकेतू व मानवी सृष्टी सुद्धा या गुरुत्वाकर्षनाच्या नियमावर आधारित आहे.
व या नियमाप्रमाणे प्रत्येक माणसात ती शक्ती , vibration ,ग्रेव्हीटी ही असते , व ती विचार बनून प्रवाहित सुद्धा असते...जी शरीरापालिकडे जाऊन आपल्या व्यक्तीमत्वाद्वारे...चेतानेद्वारे...विचारद्वारे इतरांना आकर्षित करत जाते...
व या पलीकडे अनुभवलेली जर्नी म्हणजे स्वतः ला स्वतःमधील वैचारिक व सचेतन ग्रेव्हीटी ने आकर्षित करणं.
जात , धर्म , लिंग या पलीकडे स्वतः मध्ये एक माणूस म्हणून असणारं " गुरुत्वाकर्षण" याची ओळख व जाणीव करून देणारी कार्यशाळा म्हणजेच " थिएटर ऑफ रेलवन्स"

थिएटर ऑफ रेलवन्स# पनवेल# कार्यशाळा#उत्प्रेरक#रंगचिंतक # मंजुलभारद्वाज#
अनुभव : 26 -28 जानेवारी 2018
स्वाती वाघ.

1 comment:

  1. Gravity चे सुंदर असे आयुष्याबरोबर संबंध जोडला आहे ... अति उत्तम...

    ReplyDelete