Sunday, 11 March 2018

बदल : Change...व रंगोत्सव..स्वाती वाघ

बदल : Change...व रंगोत्सव..


" बदल हा नेहमी स्वतः पासून सुरू होतो ...तू खुद्द को बदल तू खुद्द को बदल तभी तो जमाना बदलेगा "मंजुल सराचे हे वाक्य व त्यामागे असणारा अर्थ हा काल रंगोत्सव खेळताना मला आला..
होळी हा रंगांचा सण , आपुलकीचा , मतभेद , वादविवाद विसरून सर्वांना एकत्रित बांधून ठेवणारा हा उत्सव...
भारताची विविधता या रंगामधून दिसते...
कालचा दिवस हा खास या करता , कारण यावेळी होणारा बदल हा " माईंड सेट " ला तोडणारा ...व त्यातून स्वतः सोबत इतरांना नवी जर्नी देणारा आहे...
"फ्रीडम म्हणजे नेमकं काय असेल"? , याचा सुंदर अनुभव करून देणारा उत्सव म्हणजे हा रंगोत्सव...
मुलींनी घरात , आपल्या दारासमोर रंगोत्सव खेळायचा... मुलांनी मात्र सर्वत्र हाहाकार करायचा...नशेचा.., मग मुलींनी दुपारनंतर घराबाहेर पाऊल ठेवायचं... किती भीती ती...असुरक्षितता... त्या सर्वांना ब्रेक करून ...फक्त एकच ध्येय आपल्या जवळच्या लोकांसोबत खरी खुरी मायेची होळी खेळाची...मग काय संपूर्ण रस्ता सोबत होता...


"समानता म्हणजे नेमक काय? याचं सम्यक दर्शन घडवणारा दिवस म्हणजे हा रंगोत्सव,
मुलांसोबत ...मुलीसुद्धा तेही अगदी ताठ मानेने..त्याही रंगबेरंगी होऊन वाटचाल करत होत्या.
जीवनसाथी ज्यावेळी एकत्र येऊन एकमेकांना सम्मान देतात.. तेव्हा समाज सुद्धा सम्मान करतो ...याचे दर्शन रंगोत्सवाने दिले..एक मुलगी व एक मुलगा ज्यावेळी एकत्र येऊन वावरतात ...त्यावेळी नशा करणाऱ्या मंडळींना सुद्धा गांगरून सोडतात ...याच लाईव्ह उदाहरण म्हणजे हा रंगोत्सव...
स्वतः च्या माईंड सेट ला ब्रेक करून ,लिबरेटेड जर्नी करणारा उत्सव म्हणजे रंगोत्सव...
स्वाती वाघ.
अनुभव: 2 मार्च 2018

Monday, 19 February 2018

स्वतःची ओळख हीच आयुष्याची प्रेरणा असते...स्वाती वाघ


थिएटर ऑफ रेलेवन्स कार्यशाळा ,
युसूफ मेहर अली सेंटर , तारा गाव ,
पनवेल
अनुभव 26 जानेवारी - 28 जानेवारी 2018
उत्प्रेरक : रंगचिंतक मंजुल भारद्वाज.


कार्यशाळेत सहभागी होण्यापूर्वी अंजेंडा सेट असणं गरजेचं, व  तो सेट झाला होता ...एक व्यक्ती म्हणून उन्मुक्त होणं व ती उन्मुक्तता  माझ्या enterprenurship च्या ध्येयाच्या दिशेनं जोडणं. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या कार्यशाळेत मी प्रवेश केला..कार्यशाळेचे स्वरूप खूप वेगळं होतं... वैचारिक पातळी वाढवणारं... जवळ जवळ तब्बल एक वर्षानंतर मी कार्यशाळेत सहभाग घेतला होता ...शब्द वेचता येतात ..पण त्यामागील विचार कसा वेचणाऱ? हा सर्वात मोठा प्रश्न माझ्या समोर होता. सोबत असणारे रंगकर्मी व इतर सहभागी वैचारिक पाथ बराच पुढे चालून गेले होते ...मग अश्यावेळी ठरवलं ...आता आपण समजून घेऊ..शब्द लिहून घेऊ...व प्रोसेस जिवंत ठेऊ ...व हळू हळू आपल्याला ज्या वेळी त्या  शब्दमध्ये असणार स्वतःच प्रतिबिंब दिसेल तसं तसं लिहत जाऊ...व तशी सुरवात सुद्धा केली आहे
कार्यशाळेत असताना सुरू असणारी ग्रुप प्रोसेस  एक लीडर म्हणून जबाबदारीची जाणीव करून देणारी ठरली.प्रत्येक सहभागी , रंगकर्मी स्वतः चा अजेंडा घेऊन आला होता ...कार्यशाळेत  इंडिव्हिज्युअल अजेंडा हा ग्रुप ला जोडला जात होता...माईंड मॅपिंग करणं , माईंड सेट ओळखणं आपण , व्यक्तिगत पातळीवर  कसे वागतो?मेलोड्रामा बनून की एक विचार बनून? हा विचार,  हा फरक स्पष्ट होणं खूप गरजेचं असतं कारण ज्यावेळी आपण व्यक्तिगत पातळीवर विचारद्वारे जेवढे स्पष्ट होत जातो  तस-तसे आपण ग्रुप ला व्यक्तिगत भावनांच्या पलीकडे जाऊन  विचारांनी , तत्त्वांनी लीड करू लागतो ...हा नवीन पैलू मी समजून घेतला...
माईंड मॅपिंग , माईंड सेट हे दोन्ही विषय " observation based"  असतात व बहुदा येणाऱ्या अनुभवावर सुद्धा..व या observation मधील  " physical observation" व " conceptual observation " ही नवी दिशा मंजुल सरांनी दिली..ती मला खूप अनोखी जाणवली ." जिसको पता नही आप  कौन है? वहा पर आपको सूत्र हात मे लेकर लीड करना है नही तो आपको वहा नही जाना हैं! हे महत्व पूर्ण सूत्र सरांनी सांगितलं...


स्वतः चं orbit असणं किती गरजेचं आहे ...याची जाणीव या workshop दरम्यान झाली...स्वतः भोवती असणारं लेबल काढून जसं मुलीचं,बायकोचं, कर्मचारी चं व अजून इतर...हे सर्व  दूर करून स्वतः ची ओळख निर्माण करणं जी स्वतः च्या नावाची साक्ष असेल याची जाणीव झाली..
कार्यशाळेचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक क्षणी सर सहभागी साथी चे  live उदाहरण डोळ्यासमोर ठेवत होते , त्याचा एक भाग म्हणजे  Structural change ...ध्येयाला कसे विखुनडीत करते ...रात्री सर्व सहभागी एकत्र बसलो होतो तेव्हा सर्वजण एक बिंदूवर येऊन काम करत होते...विचार करत होते ..पण जसे सर्वजण  सराना च्या रूम बाहेर निघाले तसे सर्वजण विखंडीत झाले...individual ध्येया मध्ये बांधले गेले..हेच आहे ग्रुप चं ...ज्यावेळी एकत्र येतात तेव्हा ते एक ध्येया ने एक बिंदू मध्ये असतात जसे वेगळे होतात तसे individual बिंदू मध्ये अडकतात...तर अश्या वेळी individual energy ग्रुप ला पास करणं... म्हणजेच individual बिंदू ग्रुप च्या ध्येयाला जोडणं हे एकच सूत्र आहे जी ऊर्जा कायम ठेऊ शकते...या अनुभवा  वरून मला हे जाणवलं कधी विचार केला आहे का आपण असा ? "ग्रुप फक्त माणसांनी नाही तर या सूक्ष्म सूक्ष्म तत्त्वांनी , विचारांनी बांधला जातो..."
या structural changes चा political व्हिएव सुद्धा सांगितला ...विकास भूमंडळीकरण च्या नावाखाली मोठं मोठे शॉपिंग मॉल, कॉफी शॉप , बिल्डिंग तयार केल्या.लोकांचे structural विभाजन केले...सगळ्याकडे कार आहे...सर्वाना घरी लवकर जायचं..पण रस्ता एक...ट्राफिक तेवढं.. Pollution तेवढं..विकासाच्या structural बदला मध्ये...individual स्ट्रॉंग होत गेला..बिल्डिंग मध्ये घर आलं...पाणी आलं..इलेक्ट्रिसिटी आली...कार आली... पण समूह कमजोर होत गेला...ट्राफिक ..pollution.. एकटेपणा ...मानसिक आजार हे वाढत गेल..ही विकासाची Theory आहे...या उदाहहरणातून हे समझले की visual जे दिसतेय ते सर्व पाहतात परंतु त्या मागे घडत असलेले परिणाम आपण विचार सुद्धा करत नाही...

कार्यशाळेतुन मिळालेली सर्वात मोठी learning म्हणजे.." तात्विक जडणघडण ही मानअपमानाच्या पलीकडे असते" तत्व आयुष्यात किती महत्वाची असतात...स्वतःची ओळख हीच आयुष्याची प्रेरणा असते...व यासाठी प्रोसेस खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते...तर ही प्रोसेस स्वतः मध्ये कायम ठेवणं हे माझ्याकरता आव्हान आहे...कार्यशाळेतून आल्यापासून आता बहुतेक शब्द संदर्भ decode होण्यास सुरू झालेत...जी साक्ष देतात..अजून तरी मी प्रोसेस स्वतः मध्ये कायम ठेवली आहे..

स्वाती वाघ(बुंदी)
17 फेब्रुवारी 2017.

Wednesday, 7 February 2018

"Gravity " म्हणजे गुरुत्वाकर्षण..

"Gravity " म्हणजे गुरुत्वाकर्षण..


कार्यशाळेत असताना अजून एक शब्द लहानपणी शाळेत शिकवल्या गेलेल्या विज्ञाना च्या पुस्तकातील न्यूटनची आठवण करून देऊन गेला...शब्द होता स्वतः मधील Gravity... हो गुरुत्वाकर्षण...
‎न्यूटन नियमाप्रमाणे वस्तुमान असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंच्या एकमेकांकडे आकर्षिल्या जाण्याच्या प्रवृत्तीला गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. थोडक्यात कोणतीही वस्तू वरून फेकली असता ती सरळ जमिनीच्या - पृथ्वीच्या दिशेने खाली येते, म्हणजेच एक अज्ञात शक्ती , वायब्रेशन तिला पृथ्वीकडे आकर्षित करते.
"विश्‍वातल्या सर्व वस्तू एकमेकांना आकर्षित करतात" या वैज्ञानिक मूलभूत नियमावरून निसर्गाची रचना लक्षात येऊ लागली...सूर्य , ग्रह, तारे , समुद्र , सूर्यमाला, धूमकेतू व मानवी सृष्टी सुद्धा या गुरुत्वाकर्षनाच्या नियमावर आधारित आहे.
व या नियमाप्रमाणे प्रत्येक माणसात ती शक्ती , vibration ,ग्रेव्हीटी ही असते , व ती विचार बनून प्रवाहित सुद्धा असते...जी शरीरापालिकडे जाऊन आपल्या व्यक्तीमत्वाद्वारे...चेतानेद्वारे...विचारद्वारे इतरांना आकर्षित करत जाते...
व या पलीकडे अनुभवलेली जर्नी म्हणजे स्वतः ला स्वतःमधील वैचारिक व सचेतन ग्रेव्हीटी ने आकर्षित करणं.
जात , धर्म , लिंग या पलीकडे स्वतः मध्ये एक माणूस म्हणून असणारं " गुरुत्वाकर्षण" याची ओळख व जाणीव करून देणारी कार्यशाळा म्हणजेच " थिएटर ऑफ रेलवन्स"

थिएटर ऑफ रेलवन्स# पनवेल# कार्यशाळा#उत्प्रेरक#रंगचिंतक # मंजुलभारद्वाज#
अनुभव : 26 -28 जानेवारी 2018
स्वाती वाघ.

Saturday, 3 February 2018

राजनीती मुळात वाईट नाही...ती ज्या व्यक्तीच्या हाती जाते त्या प्रमाणे तिची जडण घडण होत जाते....स्वाती वाघ.


एक प्रवास
स्वतः पासून ऊर्जेच्या दिशेने...राजनीतीच्या दिशेने पहिल्यांदा ठेवलेलं एक डोळस पाऊल...ज्यामध्ये मला माझी व्यक्तिगत पैलूंची सामाजिक जडण घडण होताना दिसली ..भीती निघून गेल्यावर... आत्मविश्वास वाढतो...व आत्मविश्वासाला मिळालेली योग्य दिशा म्हणजे ऊर्जा...याचा अनुभव आला तो " थिएटर ऑफ रेलवन्स" च्या राजनीती चिंतन रैली मध्ये.... विषय सुंदर त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव करून देणारा एक नागरिक म्हणून आरसा दाखवणारा...

व्यक्तिगत पक्षा पलीकडे... व्यक्तिगत भक्ती पलीकडे... राजनीती आहे... "राजनीती शुद्ध , सात्विक, पवित्र, बौद्धिक, सामाजिक ,आर्थिक, सांस्कृतिक ,आर्थिक पराकाष्ठाओ की स्वामिनी!!! " मंजुल भारद्वाज लिखित व्याख्येचे वाचन केल्यावर डोक्यात राजनीती साठी असलेलं दूषित चित्र हळू हळू नाहीस होऊ लागते...जाणीव होउ लागली , व्यक्तिगत स्वार्थासाठी निरनिराळे पक्ष निर्माण होतात...मग त्याप्रमाणे या जनसमुदायची सुद्धा विभागणी होते... व्यक्तिगत ताकद वापरून... एकमेकांवर शिंतोडे उडवत...मग स्पर्धा जिकण्याची... निवडणुकांची...हे पक्ष तयार होतात...प्रत्येक पक्ष स्वतः चे फोल्लोवर्स करण्याचा आटोकाट प्रयत्न...मग दिवसा सुद्धा चांदण दाखवणं...आणि यात वैचारिक कमी तर आंधळी भक्ती निर्माण होते...
या मध्ये व्यक्ती नागरिक कमी..भक्त जास्त दिसतो...दुसरा या दोघांतील काही नाही झालं तर सभ्यतेची चादर पांघरून वावरत असतो..व या मध्ये गर्दी निर्माण होते ज्याला दिशा नसते आंधळी भक्ती करणारी गर्दी...
मग जाणवलं... राजनीती मुळात वाईट नाही...ती ज्या व्यक्तीच्या हाती जाते त्या प्रमाणे तिची जडण घडण होत जाते...त्या व्यक्तींना आपण राजनेता म्हणून संबोधतो...
व याची जडण घडण कोणाच्या हाती सुपूर्त करायची याचा निर्णय हा "नागरिक" म्हणून आपला असतो...जसे मुलं व्यसनी निघालं म्हणून आईच्या गर्भाला दोष देत नाही...तर त्यासाठी त्याच्या आजूबाजूचं वातावरण व त्याची होणारी जडण घडण कारणीभूत असते...अगदी असंच राजनैतिक डावपेचाचा सापळा रचून राजनीती ला दूषित करण्याचं षडयंत्र हे वर्षानुवर्षं सुरू आहे...तर अश्यावेळी एक नागरिक म्हणून स्वतः ची भूमिका डोळसपणे , निःपक्षपाती पणे ज्यावेळी या देशाचा प्रत्येक व्यक्ती बजावेल...निभावले.. त्या वेळी क्षणोक्षणी राजनीतीचा नव्याने संविधानिक जन्म होईल...ही वैचारिक स्पष्टता " थिएटर ऑफ रेलवन्स च्या राजनैतिक चिंतन रैली" मध्ये मला आली.

दिनांक 
21 जानेवारी 2018
स्वाती वाघ.